सोमवार, १४ सप्टेंबर, २०१५

काय तो निर्णय घ्याच!

आपण काही निर्णयच घ्यायचा नाही, काही जबाबदारीच घ्यायची नाही, असं कातडीबचाव धोरण असेल, तर कसं तुमचं करिअर होईल?

आपण आयुष्यात किती निर्णय घेतो. खरं तर हरघडी निर्णयच घेत असतो. गर्दीच्या वेळेस कोणती बस घ्यावी इथपासून ते कुठले कपडे घ्यायचे, कुठलं शिक्षण घ्यायचं, कुठलं करिअर करायचं हे सगळे निर्णय आपल्याला घ्यावेच लागतात. 

गर्दीच्या वेळेस स्पेसिफिक बसने वेळेवर जात, बसायला जागा, विंडो सीटही घेणं हे तुमचं लॉजिक आहे. हे लॉजिक तुमच्या मेंदूत आपोआप प्रोसेस होतं आणि तुम्ही निर्णय घेता.

आपण हे जे रोजच्या आयुष्यात करतो तेच जॉब करताना, ऑफिसातही करावं लागतं.

जेव्हा तुम्ही जॉब करता तेव्हा बरेचसे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कसं वागायला हवं इथपासून तर अचूक निर्णय घेत काम कसं तडीस न्यावं हे तुमचं तुम्ही ठरवणं अपेक्षित असतं. प्रत्येक गोष्ट तुम्ही बॉसला विचारणो अपेक्षित नाही. संस्थेच्या कल्चरप्रमाणो कदाचित एकादा बॉस सगळे निर्णय घेतही असेल, पण एखादा निर्णय घेतला आणि तो योग्य कसा आहे हे पटवून दिलं तर बॉस ऐकतो, कौतुकही करतो. असं करणारे अनेक कर्मचारी आपल्या अवतीभोवती असतात. 

उमेदवाराकडे ही अत्यंत महत्त्वाची निर्णयक्षमता आहे की नाही हेच बरेचदा मुलाखतीत तपासलं जातं. 
मुलाखतकर्ता बरेचदा एखादी काल्पनिक घटना सांगतो आणि अशा परिस्थितीत तू कसा वागशील? असं   विचारतो. या प्रश्नावर तुमच्या मेंदूचा खरा कस लागतो. एकतर अशा सिच्युएशनचा तुम्ही विचार केलेला नसतो. अचानक ती सांगितली जाते. विचार करायला वेळच नसतो. तेवढय़ातल्या तेवढय़ात मग तुम्हाला बरेचसे अल्टरनेटिव्ह स्वत: शोधावे लागतात. सांगावे लागतात.

त्या घटनेचं तुम्ही कसं विेषण करता आणि भविष्यातील होणा:या परिणामाचा कसा विचार करता हे तुम्ही सांगितलेल्या उत्तरात तपासलं जातं. निर्णय करताना तुम्ही वेगवेगळे पर्याय कसे तपासले आणि योग्य निष्कर्षावर कसे पोहोचलात हे समजून घेतलं जातं. 

खरं सांगायचं तर आजच्या वर्क कल्चरमध्ये प्रभावी निर्णयक्षमता अतिशय आवश्यक आहे. एखाद्या इमेलला काय उत्तर द्यावं या साध्या प्रश्नावर डोकं खाजवणा:या आणि हातावर हात धरून बसलेल्या अनेक व्यक्ती मी अवतीभोवती बघितल्या आहेत. 

मात्र असे निर्णय घेतल्यामुळे कामाचं प्रचंड तणाव एखाद्या व्यक्तीवर येऊ शकतो. व्यवसायावर नकारात्मक प्रभाव पडतो तो वेगळा. कर्मचा:यांसाठी एअरलाईनची तिकिटे बुक करणा:या फ्रंट ऑफिसच्या कर्मचा:याने वेळेवर तिकिटे बुक केली नाही.  तर तिकिटांची किंमत दुप्पट द्यावी लागते. एक दिवस निर्णय घेतल्यामुळे तिकिटांची किंमत वाढीव द्यावी लागते. तोटा होतोच.

प्रत्येक व्यवसायात हा नियम लागू होतो. वेळेवर निर्णय घेणं आणि कामाला लागणं महत्त्वाचं. प्रत्येक व्यक्तीचा वाटा आपल्या परीने असतो. अगदी तळातला कर्मचारीही :यापैकी कॉस्ट सेव्ह करू शकतो.

मात्र अनेकजण काही निर्णय घ्यायला, स्वत:चं डोकं चालवून काही काम करायलाच कचरतात. पण तं पाहता या प्रभावी निर्णयक्षमतेचं तंत्र खूप कठीण नाही. 

मुलाखतीत निर्णयक्षमता जोखणारा एखादा प्रश्न आलाच तर शांतपणो परिस्थिती समजून घ्या. विचार करायला एक छोटासा पॉज घ्या. कदाचित भुतकाळात अशाप्रकारची काही परिस्थिती तुम्ही, तुमच्या मित्रने, आईवडिलांनी हाताळली असेल. याचा विचार करा. वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करा आणि महत्त्वाचं म्हणजे भविष्यात या पर्यायापैकी कुठला पर्याय प्रभावी ठरू शकेल याचा विचार करून निर्णय घ्या.

उत्तर देतानाही सांगा की, मी अमुक निर्णय घेईन, त्यामागे हे लॉजिक आहे.

बिचकू मात्र नका, निर्णय घेणं तसं काही फार अवघड नसतो, फक्त जबाबदारी घ्यायची तयारी ठेवाच.

रविवार, १२ जुलै, २०१५

स्ट्रेस अच्छा होता है!



आजकालच्या नोकर्या अतिशय ताणतणावाच्या असतात. ऑफिसमध्ये कितीही चांगलं वातावरण असलं तरी एक प्रकारची स्पर्धा कायम असते. कॅन्टीनमध्ये जेवण्याच्या टेबलवर भलेही सगळे सहकारी मनापासून गप्पा मारत असतील; पण कामाचा विषय आला की ती अघळपघळ मैत्री मागे पडते आणि स्पर्धा सुरू होते.
आणि जेथे स्पर्धा असते, तेथे तणाव निर्माण होतोच. प्रत्येक बॉसला स्वत:ची टार्गेट्स असतात. त्यालाही स्पर्धा असतेच. तुमचे सहकारीही त्या स्पर्धेत असतात. अशा वेळेस एक प्रकारचा अस्पष्ट, न दिसणारा तणाव ऑफिसमध्ये तयार होतो.

तो तुमच्याही वाट्याला येतो, प्रश्न एवढाच तो तणाव तुम्ही कसा ‘मॅनेज’ करणार?

हल्ली तर मुलाखतीच्या वेळेसच उमेदवाराची स्ट्रेस हॅण्डल करण्याची क्षमता किती आहे हे तपासलं जातं. प्रश्न एकदम साधा असतो, ‘तुमचा दिवस तुम्ही कसा प्लॅन करता, काय काय करता दिवसभर’, असा एक साधा प्रश्न. तो बरेचदा विचारला जातो, त्यामागे  कारण हेच. तो अनुभवी उमेदवारालाही विचारला जातो, ‘‘ऑफिसमध्ये गेल्यावर तुझा दिनक्रम कसा असतो, हे जरा सांगशील?’’
या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देता यावरून बर्याच गोष्टी कळतात. तुमचं वेळेचं व्यवस्थापन चांगलं असेल, तर तुम्ही कामाचं व्यवस्थापनही चांगलं करू शकता. त्यातून तुमची कामाची शिस्त आणि तुमची ताण घेण्यादेण्याची कुवत समजते. अनेकांना आपल्या कामाची प्रायॉरिटी काय आहे हेच बरेचदा समजत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी अनेक गोष्टी तातडीच्या होऊन जातात. आणि ह्या तातडीच्या गोष्टी कशाबशा पूर्ण करताना तणाव निर्माण होऊन तुमच्याकडून चुका होतातच.

दुसरा तणाव हा नातेसंबंधातील गडबडीने येतो. बर्याचदा चुकीच्या माहितीमुळे अथवा गैरसमजामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो. काही वेळेस दोन व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामुळे तणाव निर्माण होतो.
समजा तुमचा एक सहकारी अतिशय अँग्रेसिव्ह आहे आणि तुमचा स्वभाव साधासरळ आहे, तुम्ही तुमचे शब्द तावून सुलाखून वापरता आणि तुमचा सहकारी एकदम ‘बोल्ड’ आहे. तुम्ही दोघे एका ‘प्रोजेक्ट’वर काम करता. तुम्ही दोघेही सारखेच काम करता, पण तो बोलका असल्यामुळे नेहमी ‘व्हीजिबल’ असतो. अशावेळेस कधीतरी तुमच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. हा न्यूनगंड तणावाचं कारण होऊ बसतो.

हे सर्व तुम्ही कसं मॅनेज कराल? कामाचा तणाव, सहकार्यासोबत वागताना निर्माण होणारा तणाव, बॉसने झापल्यावर निर्माण होणारा तणाव, ऑफिसमधील वातावरणामुळे तयार होणार तणाव, असे बरेचसे तणाव तुमच्या कामावर आणि प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. हे सर्व कसं हॅण्डल करायचं याची उत्तरे वेगवेगळी आहेत. त्या त्या वेळच्या सिच्युएशननुसार तो तो ताण हाताळावा लागतो. अवघड असतंच, पण अशक्य नाही.
अनेकदा तर आपल्या मनातल्या भीतीमुळे अथवा अकारण चिंतेमुळे जास्त तणाव निर्माण होतो. समजा मुलाखतीत विचारलंच तुम्हाला की, स्ट्रेस कसा हॅण्डल कराल तुम्ही?

तर खुशाल सांगावं, ‘‘मी परिस्थितीचा विचार करेन, वाईटात वाईट काय होईल याचा अंदाज घेईन, जे होईल ते स्वीकारण्याची तयारी करेल, पण जे वाईट होऊ शकतं ते  टाळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन !’’
- हे एक ‘स्टॅण्डर्ड’ उत्तर तुम्हाला देता येईल. शेवटी अशा अवघड परिस्थितीतून बाहेर पडतच तर तुम्ही तुमचं ‘मेटल’ सिद्ध करत असता ना?

कधी कधी ‘‘स्ट्रेस’’ भी अच्छा होता है!

शनिवार, २० जून, २०१५

पुढील तीन वर्षांत / पाच वर्षांत तुम्हाला स्वत:ला कुठे बघायला आवडेल’


"सर, पुढील पाच वर्षांत मला मॅनेजर व्हायचं आहे". एक उमेदवार, मुलाखतकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देत सांगत होता.  प्रश्न होता, ‘पुढील तीन वर्षांत / पाच वर्षांत तुला स्वत:ला कुठे बघायला आवडेल’?’

नुकत्याच कॉलेजमधून बाहेर पडणारा हा उमेदवार तीन ते पाच वर्षांत व्यवस्थापक बघण्याची स्वप्नं पाहतो, यात चुकीचं काहीच नाही; परंतु अशा प्रश्नांची उत्तरं देताना थोडं वास्तवाचं, स्वत:च्या कुवतीचं भान ठेवायला नको का? 

बर्याच मुलांना वेगवेगळ्या आणि भन्नाट अशा पदांची भुरळ पडते. बर्याचदा उमेदवाराच्या कामाचा आणि पदाचा काहीच संबंध नसतो. पद म्हणजेच डेसिग्नेशन बर्याचदा फसवी असतात. एका बँकेच्या कर्मचार्याचं पद होतं रिजनल मॅनेजर आणि तो प्रत्यक्षात तो घराघरात / ऑफिसात जाऊन बँकेचे खाते उघण्याचं काम करायचा आणि रिजन म्हणजे तरी केवढा भाग तर  पुण्यातील कोथरुड हे एवढंच त्याचं रिजन. आणि ते मॅनेज करणारा हा मॅनेजर ! 

त्यामुळे अशा प्रश्नांकडेही मुलाखत देताना जरा बारकाईनं पहायला हवंच.

मुळात आपल्या आयुष्याचं ध्येय काय हे जर स्वत:ला क्लिअर नसेल तर अशा किचकट प्रश्नांची उत्तरं जास्तच अवघड वाटतात. बीई आणि एमबीएची डिग्री हातात असेल तर कदाचित नोकरीला लागल्यावर तीन वर्षांत मॅनेजर होण्याची संधी मिळतीलही,  पण हे असं टामटूम मॅनेजर होऊन तुम्ही काय कमवाल?

त्यापेक्षा स्वत:च्या कामाचं ध्येय जरा गांभीर्यानं घ्या आणि तुमच्या बायोडाटामध्ये ऑबजेक्टिव्ह नावाचा जो प्रकारही एकदा वाचाच. खरंतर ते स्वत:चं ध्येय, ते स्वत: लिहावं पण कॉपीपेस्ट करण्याच्या नादात ते काही कुणी वाचत नाहीच. 

नसेलही तुमचं तुम्हाला क्लिअर की आपल्याला पुढे काय करायचं तर स्पष्ट सांगा, तेही अगदी नम्रपणे. ‘‘सर, सध्या तरी माझी प्रायॉरिटी चांगल्या कंपनीत चांगला जॉब मिळावा हीच आहे, पुढील तीन वर्ष या जॉबमध्ये सेटल होऊन कंपनीला योग्य ते आऊटपुट देणं हेच माझं ध्येय असेल’’ 

आता विचार करा, हे उत्तर चांगले की ‘‘मला मॅनेजर व्हायचंय, हे उत्तर चांगलं?’’ विचार करा!
तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर त्या अनुभवांवर चांगले पद केव्हाही मिळेल. मात्र तुम्हाला नुस्तं पद हवंय की ‘रोल’ हवाय? हे महत्त्वाचं. 

तेव्हा तुमचं ध्येय ठरवा, ते तुम्ही मागत असलेल्या जॉबशी लिंक कसं करायचं हे शिका तरच तुम्ही गर्दीत वेगळे दिसाल. नामकेवास्ते टामटूम पदाची प्रौढी मिरवण्यात काय हाशिल?

गुरुवार, १९ मार्च, २०१५

Time Management & Priority Setting: फ्री टाइमचं काय करता? - ते काय असतं?



भ्यासाव्यतिरिक्त तू काय करतोस? म्हणजे अभ्यास नसेल तेव्हा काय करतोस? फुरसतीचा वेळ कसा घालवतोस? 

-असे प्रश्न तीन महिन्यांपूर्वी एका इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना आम्ही विचारले.
रिकाम्या वेळेत मी माझ्या गर्लफ्रेण्डसोबत असतो. असं त्याचं डिरेक्ट उत्तर होतं. त्याला सरळ रिजेक्ट करण्यात आलं. अभ्यास  नसेल, तेव्हा मैत्रिणीसोबत घालवत असतो हे त्याचं उत्तरही प्रामाणिक असेल, त्यानं ते देण्यात डेअरिंगही असेल. पण या एका उत्तरावरून व्यक्तिमत्त्वाची चुणूक दिसून येते. ज्या वयात करिअरवर लक्ष देण्याची गरज आहे, त्या वयात सगळा वेळ असा घुमण्या फिरण्यात घालवून कसं चालेल?

प्रेमाता पडणं, गर्लफ्रेण्ड असणं, तिला वेळ देणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. पण सगळा वेळ ‘असाच’ जातो, आपल्या हाती असलेल्या वेळातून प्रॉडक्टिव्ह असं काहीच घडत नाही, वेळेचं योग्य नियोजन करता येत नाही हे चूक आहे.

what do you do when you have free/leisure time?

हा प्रश्न मुलाखतीत तसा हमखास येतोच. या उत्तरातूनही तुमच्या व्यक्तिमत्तवाचे पैलू समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

तुम्ही सहज जरा स्वत:ला प्रश्न विचारा की, फुरसतीच्या वेळेत तुम्ही काय करु शकता? काय करता?

 तुमचे छंद जोपासू शकता का? वाचन करता का? चार लोकांमध्ये जाऊन एखाद्या प्रोजेक्टवर काम करू शकता, ट्रेकिंगला जाऊ शकता, गर्लफ्रेण्डसोबत जायलाही हरकत नाही, ग्रूपबरोबर आउटिंगही करु शकता आता या सर्व activities तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या कामासोबत लिंक करता ते महत्त्वाचं ठरतं.

तुमचे छंद तुम्ही जोपासत असाल तर तुमचा स्ट्रेस कमी करायला ते मदत करतात. भरतनाट्यम केल्याने तुमचे कॉन्संट्रेशन वाढते, गाण्याच्या रियाजाने तुमचा आवाज साफ होतो. तुम्ही छान रमता एका वेगळ्या जगात, तुम्ही ट्रेकिंग करत असाल, तर तुमची रिस्क टेकिंग अँबिलिटी लक्षात येते.

पण जेव्हा असा प्रश्न येतो, तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार, याचा विचार करा! काहीतरी इंटरेस्टिंग तुम्ही करू शकताच. फेसबुक / व्हॉट्स अँप वर असणं, पार्टी करणं, खूप टीव्ही बघणं हे इंटरेस्टिंग असू शकतं. परंतु तुमचा वेळ तुम्ही नेमका कसा घालवला याचं उत्तर व्हच्यरुअल प्रेझेन्स असू शकत नाही ना?  तो वेळ का वापरला तिथं याची काही पॉझिटिव्ह साईड सांगता मात्र यायला हवी.

भारतातील व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती मी आजवर घेतल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बायोटेडामध्ये छंद म्हणजेच हॉबी हा कॉलम हा प्रकर्षाने लिहिलेला असतो आणि निव्वळ लिहिलेला नसतो, तर काही विद्यार्थी ते मनापासून जोपासतात. या सर्वांचा फायदा त्यांना त्याच्या त्यांचा आत्मविश्वास दुणावण्यात होतोच असतो.

दुर्दैवाने महाराष्ट्रातील काही महाविद्यालयातली मुलं पुस्तकंही वाचत नाही. वर्तमानपत्रही रोज वाचत नाहीत.

ते काय उत्तर देणार, या अशा ट्रिकी प्रश्नांचं?

तेव्हा तुम्ही ठरवा, फुरसतीच्या वेळाचं तुम्ही काय करता?

शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

शो, युवर अॅटिट्यूड!

·      

आयुष्यात
यशस्वी होण्यासाठी तुमचा  अॅटिट्यूड महत्वाचा ठरतो. एखाद्या व्यक्तीचे, घटनेचे, उपक्रमाचे, कल्पनेचे तुम्ही कशा पद्धतीने मुल्यमापन करता, या गोष्टींवर तुमचा हा अॅटीट्यूड अवलंबून असतो.


हल्ली बर्याच संस्थांतले मॅनेजमेण्टवाले खुलेआम म्हणतात, ‘‘आम्ही अॅटीट्यूडू बघून उमेदवाराला नोकरी देतो. कौशल्यं त्याला केव्हाही शिकवता येतील! ’’

मग तुमचा हा अॅटिट्यूड ते कसं ओळखतात? 

तुमचा अॅटीट्यूड हा तुमच्या वागण्यातून संभाषणातून जाणवतच असतो. 
तो सकारात्मक असू शकतो, नकारात्मकही असू शकतो. बोलताना चटकन लक्षात येते.

काही व्यक्ती आयुष्यात फारच नकारात्मक असतात. प्रत्येक गोष्टीत त्यांना वाईट गोष्टीच दिसतात. घटनेचं नकारात्मक विश्लेषण करण्यातच त्यांना मजा येते. ज्या त्या गोष्टीला ते नावंच ठेवतात, नाकं मुरडतात. अर्थात हा अॅटीट्यूड त्यांच्यावर झालेल्या संस्कारातूनही तयार झालेला असतो. 

मुलाखतीच्या वेळेस एखादा प्रश्न असा येतो की त्याचं उत्तर तुमचा अॅटीटयूड सांगून जातो. 
‘‘अशी एखादी घटना सांग की जेव्हा कामात अपयश आलं..’’ 
बरेचदा  अनेक उमेदवार आपल्या अपयशाबद्दल सांगायला तयारच नसतात. त्यांना वाटतं की आपलं अपयश सांगितलं तर, आपली कमतरता पुढे येईल. इथेच खरा अॅटीट्यूडचा प्रश्न येतो. 

एखादा उमेदवार या अपयशातून काय शिकला, आपल्या व्यक्तीमत्वात, विचारात त्याने काय बदल करुन घेतला हे समजून घेण्याचा  प्रयत्न मुलाखत घेणारा करत असतो. अपयश हे महत्वाचे नसते, महत्वाचे असते, तुमची एखाद्या घटनेतून शिकण्याची,अपयशातून उभारण्याची प्रकृत्ती.

त्यातून तुमचा अॅटीट्यृूड तयार होत असतो. आपण जे बघतो, जे अनुभवतो, त्यावरुन हे सर्व अनुभव, निरिक्षण तुम्हाला काही चांगलं देत असतील तर त्याचा अवश्य विचार करा. एखाद्या गोष्टीबद्दलची निव्वळ नकारात्मकता ही त्या प्रसंगाची, घटनेची, व्यक्तीची पृूर्ण ओळख होऊ शकत नाही.

‘‘एखाद्या वेळी तुम्ही तुमच्या बॉसची क्रिटिकल कॉमेंट ऐकली का?’’

असा प्रश्न कुणी विचारला तर, जसं हो नाही उत्तर देता येईल, तसंच त्या क्रिटिकल कॉमेण्टमुळे काय सुधारणा केली हे ही सांगता येईल.

तसाच आणखी एक प्रश्न.
‘‘हा तुमचा प्रोजेक्ट जर तुमच्या गाईडने नाकारला तर काय कराल?’’ 
हा साधा प्रश्न.
‘‘मी तो का नाकारला जातोय हे बघेल आणि गाईडच्या अपेक्षा समजून घेऊन नंतर निर्णय घेईल’’ हे एक उत्तर.
दुसरं असंही म्हणता येईल,
‘‘नाईलाज आहे, मी काय करु शकतो, गाईड जे सांगेल ते मला करावे लागेल’’ !

तुमचं उत्तर कुठलं तुम्ही ठरवा, कारण त्यावर तुमचा अॅटिट्यूड ठरेल. आणि तुमच्या अॅटिट्यूडवर तुमच्या संधीच्या शक्यता ठरतील.