शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

शो, युवर अॅटिट्यूड!

·      

आयुष्यात
यशस्वी होण्यासाठी तुमचा  अॅटिट्यूड महत्वाचा ठरतो. एखाद्या व्यक्तीचे, घटनेचे, उपक्रमाचे, कल्पनेचे तुम्ही कशा पद्धतीने मुल्यमापन करता, या गोष्टींवर तुमचा हा अॅटीट्यूड अवलंबून असतो.


हल्ली बर्याच संस्थांतले मॅनेजमेण्टवाले खुलेआम म्हणतात, ‘‘आम्ही अॅटीट्यूडू बघून उमेदवाराला नोकरी देतो. कौशल्यं त्याला केव्हाही शिकवता येतील! ’’

मग तुमचा हा अॅटिट्यूड ते कसं ओळखतात? 

तुमचा अॅटीट्यूड हा तुमच्या वागण्यातून संभाषणातून जाणवतच असतो. 
तो सकारात्मक असू शकतो, नकारात्मकही असू शकतो. बोलताना चटकन लक्षात येते.

काही व्यक्ती आयुष्यात फारच नकारात्मक असतात. प्रत्येक गोष्टीत त्यांना वाईट गोष्टीच दिसतात. घटनेचं नकारात्मक विश्लेषण करण्यातच त्यांना मजा येते. ज्या त्या गोष्टीला ते नावंच ठेवतात, नाकं मुरडतात. अर्थात हा अॅटीट्यूड त्यांच्यावर झालेल्या संस्कारातूनही तयार झालेला असतो. 

मुलाखतीच्या वेळेस एखादा प्रश्न असा येतो की त्याचं उत्तर तुमचा अॅटीटयूड सांगून जातो. 
‘‘अशी एखादी घटना सांग की जेव्हा कामात अपयश आलं..’’ 
बरेचदा  अनेक उमेदवार आपल्या अपयशाबद्दल सांगायला तयारच नसतात. त्यांना वाटतं की आपलं अपयश सांगितलं तर, आपली कमतरता पुढे येईल. इथेच खरा अॅटीट्यूडचा प्रश्न येतो. 

एखादा उमेदवार या अपयशातून काय शिकला, आपल्या व्यक्तीमत्वात, विचारात त्याने काय बदल करुन घेतला हे समजून घेण्याचा  प्रयत्न मुलाखत घेणारा करत असतो. अपयश हे महत्वाचे नसते, महत्वाचे असते, तुमची एखाद्या घटनेतून शिकण्याची,अपयशातून उभारण्याची प्रकृत्ती.

त्यातून तुमचा अॅटीट्यृूड तयार होत असतो. आपण जे बघतो, जे अनुभवतो, त्यावरुन हे सर्व अनुभव, निरिक्षण तुम्हाला काही चांगलं देत असतील तर त्याचा अवश्य विचार करा. एखाद्या गोष्टीबद्दलची निव्वळ नकारात्मकता ही त्या प्रसंगाची, घटनेची, व्यक्तीची पृूर्ण ओळख होऊ शकत नाही.

‘‘एखाद्या वेळी तुम्ही तुमच्या बॉसची क्रिटिकल कॉमेंट ऐकली का?’’

असा प्रश्न कुणी विचारला तर, जसं हो नाही उत्तर देता येईल, तसंच त्या क्रिटिकल कॉमेण्टमुळे काय सुधारणा केली हे ही सांगता येईल.

तसाच आणखी एक प्रश्न.
‘‘हा तुमचा प्रोजेक्ट जर तुमच्या गाईडने नाकारला तर काय कराल?’’ 
हा साधा प्रश्न.
‘‘मी तो का नाकारला जातोय हे बघेल आणि गाईडच्या अपेक्षा समजून घेऊन नंतर निर्णय घेईल’’ हे एक उत्तर.
दुसरं असंही म्हणता येईल,
‘‘नाईलाज आहे, मी काय करु शकतो, गाईड जे सांगेल ते मला करावे लागेल’’ !

तुमचं उत्तर कुठलं तुम्ही ठरवा, कारण त्यावर तुमचा अॅटिट्यूड ठरेल. आणि तुमच्या अॅटिट्यूडवर तुमच्या संधीच्या शक्यता ठरतील.

रविवार, ४ जानेवारी, २०१५

प्रसंगावधान (Presence of Mind) ते आणायचं कुठून?


फॅक्टरीज अॅक्टच्या कोणत्या सेक्शन खाली कंपनीच्या संचालकांना अटक होऊ शकते?’ 
-असा एक प्रश्न एका हुशार मुलाखतकर्त्याने नुकत्यात एमबीए झालेल्या हुशार मुलाला विचारला. याचं उत्तर मुलाखतकर्त्याला  कितपत माहिती होतं, माहीत नाही, पण त्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं. ‘‘सर,  फ्रॅकली स्पिकिंग मला हा सेक्शन आठवत नाही, पण जर माझं सिलेक्शन  झालं तर कंपनीच्या संचालकांना अटक होणार नाही एवढं परफेक्ट काम मात्र माझं असेल.’’

हे उत्तर चूक होतं की बरोबर, हा प्रश्न वेगळा. पण त्या तरुणानं प्रसंगावधान दाखवून वेळ धकवून नेली. रोजच्या जीवनात घडणा-या किती गोष्टी आपल्या लक्षात राहतात? त्यातील किती गोष्टी आपल्या मनाप्रमाणो घडतात आणि किती गोष्टी तुमच्यावर प्रभाव गाजवतात याचे एक तुलनात्मक स्टेटमेंट बनवल्यावर आपल्या लक्षात खूप काही विचार येतात आणि एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे कॉमनसेन्स आणि प्रसंगावधान. या गोष्टी आपल्याला यशाच्या पायरीर्पयत निश्चितच घेऊन जाऊ शकतात.

आपल्या रोजच्या जीवनात असंच प्रसंगावधान अपेक्षित आहे. पण सर्वानाच ते जमतं असं नाही. प्रसंगावधान  ही संभाषण चातुर्याची पहिली पायरी आहे. एखाद्या क्रिटिकल परिस्थितीत आपण गोंधळतो, काय करावं नेमकं हेच आठवत नाही. डोक्यात येत नाही तेव्हा हे प्रसंगावधान कामी येतं.

काही लोकांनाच ही कला जमते? पण त्यांनाच का जमते? प्रयत्न केला तर थोडय़ाशा अनुभवानं  तुम्हालाही जमू शकेल. मुळात प्रसंगावधानाची  आवश्यकता कोठे पडते? ती साध्या घटनात फारसं महत्त्व ठेवत नाही, पण अशा बुद्धीचा कस लागतो तो एखाद्या गंभीर घटनेत. खरंतर मोक्याच्या घटनांच्या वेळी तर्कसंगत बुद्धीचा योग्य वेळी वापर करून परिस्थिती निभावून नेणं म्हणजे हे प्रसंगावधान.

प्रश्न आहे ते आणायचं कुठून? दाखवायचं कसं ? एखाद्या घटनेकडे बघताना, एखादी घटना अनुभवताना एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्याची कुवत. जॉब करताना आणि करिअरच्या पाय:या चढताना प्रत्येकवेळी अगदी किचकट आणि कठीण पद्धतीनंच प्रश्न सोडवायची गरज नसते.  इंटरव्ह्यू देताना, प्रेङोण्टेशन देताना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना, एखादी परिस्थिती सांभाळताना :याचदा हे प्रसंगावधानच उपयोगी येतं.  तुमच्या अवतीभोवती तुमच्या संबंधित घटना घडते. अगदी स्पंजप्रमाणो ती घटना आणि त्या घटनेमागचं लॉजिक टिपून घेतलं की, तुम्हाला विचारांची संगती लावता येईल.


काही व्यक्ती बोलण्यात चतुर असतात, त्या शाब्दिक कोडी छान करतात, प्रसंगनिष्ठ विनोद करतात. एखादं वातावरण हलकंफुलकं करतात. कारण एखादी विसंगती टिपण्यासाठी आवश्यक असणारी त्यांची निरीक्षणशक्ती अफाट असते. तो त्यांचा स्थायीभाव बनतो, अशा व्यक्तीचं प्रत्येक बोलणं हे त्याचं प्रसंगावधान असतं. नव्या काळात हे शिकावंच लागेल. तर आणि तरच निभाव लागण्याची काही शक्यता आहे.