रविवार, ७ सप्टेंबर, २०१४

फॅमिली बॅकग्राऊण्ड कसंय तुमचं?

फॅमिली बॅकग्राऊण्ड कसंय तुमचं? - असं मुलाखत घेणा:यानं विचारलं तर तुम्ही काय सांगता, बढाचढाके बोलता की सेण्टी मारता?


व्हॉट इज युवर फॅमिली बॅकग्राऊण्ड? - तुङया कुटुंबीयांबद्दल मला काहीतरी सांग. हा प्रश्न मुलाखत घेताना प्रत्येकाला विचारला जातो.

अनेकांना वाटतं, कुटुंबाचा आणि  जॉब सिलेक्शनचा काही संबंध आहे का? असले प्रश्न कशाला उगीच विचारतात. खरंय त्यांचं अजून तरी हा असा प्रश्न विचारणं भारतात तसं चुकीचं मानलं जात नाही. पण अमेरिकेत किंवा युरोपीयन देशांमध्ये मात्र हा प्रश्न मुलाखतीत विचारता येत नाही. जर फॅमिली बॅकग्राऊण्डवरून उमेदवाराला  जॉब नाकारला आहे असं वाटलं तर उमेदवार त्या मुलाखत घेणा:या व्यक्तीच्या आणि कंपनीच्या विरुद्ध डिसक्रिमिनेश केलं म्हणून कोर्टात जाऊ शकतो.

मुलाखत घेणा:यांच्या सुदैवाने आणि उमेदवाराच्या दुर्दैवाने भारतात मात्र आजही या प्रश्नाला खूप महत्त्व आहे. उमेदवाराची जडणघडण (विचारांची) त्याच्या व्यक्तिमत्त्वामागील प्रभावी घटना कोणत्या आहेत, हे जाणून घेण्याचा येथे हेतू असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर आपल्या पालकांचा, घरातील मोठय़ा व्यक्तींचा शाळेतील वातावरणाचा आणि समाजातील घटकांचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात पडत असतो. या प्रश्नाचं उत्तर आपण खूप लाईटली दिलं तर मात्र मुलाखतकर्ता वेगळा विचार करू शकतो. खरंतर या प्रश्नाचं उत्तर लाईटली देऊ नये आणि उगीच कौटुंबिक मेलोड्रामाही सांगत बसू नये.

जरा तारतम्यानं स्वत:विषयीची माहिती मात्र देता यायला हवीच. 

श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब बॅकग्राऊण्ड हे कधीही जॉब सिलेक्शनसाठी महत्त्वाचे घटक ठरू शकत नाही. पण ते घटक तुमच्या अॅटिटय़ूडमध्येही  दिसायला नको. तुम्ही श्रीमंत आहात आणि म्हणून तुम्हाला मिळालेल्या जॉबची काही किंमतच वाटणार नाही, काही गरज नाही तुम्हाला नोकरीची असं मुलाखतकत्र्याला वाटायला नको. किंवा तुम्ही खूप गरीब आहात, त्यामुळे मुलाखत घेणा:याला तुमच्याविषयी सहानुभूतीही वाटायला नको. 

इथेच तुमचा अॅटिटय़ूड महत्त्वाचा ठरतो. ब:याचदा मुलं कर्ज करून शिक्षण घेतात आणि मुलाखतीच्या वेळेस या कर्जाचा बाऊ करतात, कर्ज घेऊन शिक्षण घेतलं असं सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रय} करतात.
पण तसं सांगायची काही गरज नाही, म्हणजे सांगितलं तरी त्याचं भांडवल करू नका, मुलाखत घेणारा म्हणालाच की तुमचे पर्सनल प्रॉब्लम हा तुमचा प्रश्न आहे, कंपनी काही करू शकत नाही, तर कसं वाटेल तुम्हाला?

त्यामुळे तुमच्या परिस्थितीचा वेगळा विचार करा. तुमच्या कौटुंबिक पाश्र्वभूमीचाही अभिमान बाळगा आणि जे आहे ते योग्य प्रकारे सांगा. तुमच्या बॅकग्राऊण्डमुळे तुम्ही काय शिकलात, घरातील लोक कसे सपोर्टिव्ह आहेत, जॉबसाठी आवश्यक असणारे गुण तुम्ही घरीच कसे शिकलात हे सांगितलं तर बरं होईल.
उदा. माङया वडिलांनी खूप कष्टानं आम्हाला शिकवलं, मला आणि भावंडांना कशाचीही कमी पडू दिली नाही म्हणून आम्ही आज हे शिक्षण घेऊ शकलो. माङया वडिलांचा सकारात्मक गुण आणि जिद्द माङयातही आहे. असं सांगितलं तर तुमच्याविषयी मुलाखतकत्र्याचंही योग्य मत तयार होऊ शकेल. बढाचढाके बोलू नका, पण योग्य माहिती, योग्य शब्दात देण्याची सवय लावा.

(लोकमत ११ जुलै २०१४) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: