सोमवार, २९ डिसेंबर, २०१४

अरे, काही कॉमनसेन्स आहे की नाही?

 
 कॉमनसेन्स हा शब्द आपण रोजच्या जीवनात नेहमीच वापरतोहा शब्द आपल्या एवढय़ा जवळचा आहे की एखादी घटना घडल्यावर चटकन आपल्या जिभेवर हा शब्द येतो. 

हा कॉमनसेन्सचा भाग आहेएवढाही कॉमनसेन्स नाही? अरे कुठे गेला तुझा कॉमनसेन्स? अशासारखी वाक्यं अगदी क्षणाक्षणाला वापरली जातातदुसर्यांच्या कॉमनसेन्सबद्दल असे सर्रास प्रश्न निर्माण करतानाआपला कॉमनसेन्स मात्र आपण खूपदा वापरत नाही.
जे वैयक्तिक संदर्भात होतं तेच कामाच्यानोकरीच्या जागी हमखास होतं.
कामाच्या जागी बर्याच गोष्टी कॉमनसेन्सवर साध्य होऊ शकतातकरता येऊ शकतातबर्याच किचकट प्रश्नांची उत्तरं अगदी साधी असू शकतात. 
पण असतो काय हा कॉमनसेन्स?
एखाद्या गोष्टीचंघटनेचं सारासार विवेकदृष्टीनं किमान (कमीत कमीसमज वापरून केलेलं विश्लेषण म्हणजे कॉमनसेन्स. 
अवघड प्रश्न हा आहे कीहा कॉमनसेन्स येतो कसा? 
तो येत नाही चटकनकमवावा लागतोरोजच्या अनुभवातूननिरीक्षण शक्तीतून आपण हा कॉमनसेन्स कमवत असतो. 

उदाहरणार्थआपण पेपरमध्ये फसवणुकीच्यादुप्पट तिप्पट व्याज देण्याच्या लॉटरी लागण्याच्याकाहीही  करता अमुक लॉटरी लागल्याचे ईमेल्स येण्याच्या प्रकरणात फसलेल्यांच्या बातम्या नेहमीच वाचत असतोआणि अनेकदा शिकलीसवरलेली मंडळीही या सगळ्यात अडकल्याचं वाचतो. 
का होतं असंअसे फसवणुकीचे गुन्हे नेहमी घडत असतानाआपण वाचत असतानाही लोक का अडकतात या ट्रॅपमध्ये आपल्याला नेहमी वाटतं कीजातो कुठं यांचा कॉमनसेन्स? 
म्हणजेच काय कॉमनसेन्स कमवायला नेहमी स्वत:लाच आलेल्या अनुभवाची गरज असतेअसं नाही. 
अनेकांचं ऐकूनवाचूनमिळालेली माहिती योग्यवेळी पूर्ण विचारांती वापरू शकतोतोच हा कॉमनसेन्स.
काही घटना वारंवार घडत असल्या तर मागे आपण अशा परिस्थितीत कसे वागलो होतो हे आठवता येतंत्यातून आपण स्वत: सुधारणा करतोकरू शकतोम्हणजे अर्थात सुधारणा करण्याची तयारी हवी.
रोजच्या आयुष्यात घडणार्या खूप घटना असतातअगदी छोट्या छोट्याते छोटे छोटे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला असा समजेवर आधारित कॉमनसेन्सच वापरावा लागतो.
एमबीएच्या कोर्समध्ये हा कॉमनसेन्स मात्र शिकवला जात नाही.
तो आपल्यालाच कमवावा लागतोपण अनेकांना वाटतं कीआपण एमबीए आहोतआपल्याला काय असले प्रश्न विचारतात?
आता हेच पहातुम्ही मुलाखतीला गेलातमुलाखत सुरू आहेतुमचा मोबाइल बंद करायचा तुम्ही विसरलात आणि अचानक तुमच्या मोबाइलची रिंग वाजली तुम्ही काय कराल? 
कधी कधी मुलाखतकर्ता तुमचा कॉमनसेन्स बघण्यासाठी एखादी अशीच परिस्थिती निर्माण करतोआजकाल अनेक ऑफिसमध्ये ऑफिसबॉय वगैरे नसतातत्यामुळे चहाकॉफी स्वत: घ्यावी लागतेअशा वेळेस एखादा मुलाखतकर्ता तुम्हाला कॉफी ऑफर करत असेल तर काय कराल?
जर तुम्ही खरंच मुलाखतीची नीट तयारी केलेली असेलतर हे प्रकरण हॅन्डल करणं फारसं कठीण नाही. 
त्यासाठी काही गोष्टी तरी नक्की करता येतील.
तुम्ही मुलाखतीच्या अर्धा तास आधी तरी त्या ऑफिसमध्ये हजर रहायला हवंतुमच्या निरीक्षणातून ऑफिसचं कल्चरकामाची पद्धतलोकांच्या वागण्यातून तुम्ही काही अंदाज लावू शकता.

जर ऑफिसमध्ये इनफॉर्मल कल्चर असेलऑफिसबॉईज नाहीत इथं कामाला असं लक्षात आलं तर तुम्ही कॉफी अगदी नम्रपणे नाकारू शकता. 
बर्याचदा कॉफी ऑफर करणं हा निव्वळ एक फॉरमॅलिटीचा भाग असू शकतो.
अशा वेळेस आपण कसं वागायचं हे आपला कॉमनसेन्सच आपल्याला सांगतोतो सदासर्वकाळ एकसारखा नसतो आपण तो डेव्हलप करू शकतोतो कसा करायचा?

तर त्यासाठी रोजच्या रोज अगदी झोपेतून उठल्यापासूनच्या घटनांचा अभ्यास करायला हवाआपण कसे वागतोकसे वागू शकलो असतो हे जरा नीट बारकाईनं पाहिलं तर जमू शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: