शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

प्रोअँक्टिव्ह’ व्हायचं म्हणजे आम्ही नेमकं काय करणं अपेक्षित आहे?


आम्ही तर आमच्या परीनं पाहिजे तेवढं काम करतच असतो. उलट बॉस जे जे काम सांगतो, ते ते सारं करतच असतो, मग आणखी प्रोअँक्टिव्ह व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं?’

अनेक जणांना हा प्रश्न नेहमी पडतो. बर्याच जणांच्या आयुष्यात हा शब्द नोकरीला लागल्यावर एकदमच शिरतो. मग अनेकांना ऑफिसमध्ये ऐकावं लागतं की, तुम्ही अँक्टिव्ह नाही, म्हणून तुम्हाला यंदा काही पगारवाढ नाही. त्याआधीही कॉलेजात प्राध्यापकांनीही त्यांना असे टोमणे येता जाता मारलेले असतात, पण दुर्लक्ष केल्यानं ही वेळ ओढावते, एवढंच.  

तर प्रोअँक्टिव्ह असणं म्हणजे नेमकं काय? खरं सांगायचं तर हा एक साधा  प्रश्न तो एखाद्या मोठय़ा समस्येत परावर्तित होण्याच्या आधी पावले उचलायला हवीत. तो प्रश्न सोडवायची प्रक्रिया सुरू करायला हवी. उदाहरणार्थ, आपल्या आयुष्यात खूप प्रश्न आणि समस्या असतात असं नाही, पण छोट्या छोट्या समस्या मोठय़ा समस्येत अनेकदा परावर्तित होतात.उद्या विजेची बिलं भरायची शेवटची तारीख आहे

विजेचं बिल टेबलावर पाच-सहा दिवसांपासून पडून आहे. त्यात उद्या रविवार. बिल भरायचा आज शेवटचा दिवस. आपण निदान आईला आठवण करून द्यायला पाहिजे, नाहीतर स्वत: तरी भरून टाकायला पाहिजेनेट बॅँकिंग आहेच ना, मोबाइलवर, ते वापरता येतं. थोडक्यात काय स्वत:हून बिल भरणं म्हणजे प्रोअँक्टिव्हनेस. आईची नजर पडल्यावर, तिथं चार वेळा बजावल्यावर ते भरणं याला म्हणायचं, रिअँक्टिव्ह अँप्रोच.थोडक्यात सांगकामेपणा, तो कुणालाच आवडत नसतो

पण मग मुलाखत घेणारे कसं ओळखतात की एखादा उमेदवार हा  प्रोअँक्टिव्ह आहे की नाही? तुमच्याशी बोलताना तुम्ही एखाद्या परिस्थितीत कसे वागाल, एखादा प्रश्न/समस्या आधीच समजावून घेऊन ती कशी सोडवली याचा अंदाज घेणारे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात

त्यासाठीची उदाहरणं सांगा, असंही विचारलं जातं. अगदी प्रोजेक्ट करताना काय समस्या येऊ शकतात. प्रोजेक्टसाठी कॉलेज एखाद्या कंपनीचा लीड देईल आणि मग आम्ही तेथे जाऊ, असं अनेकांना वाटतं. कॉलेज कधीच लीड देत नाही आणि मग प्रोजेक्ट सबमिट करायची वेळ येते, तेव्हा धावपळ करावी लागते. मग ओळखीच्या लोकांच्या मनधरणी करण्यापासून तर खोटी  सर्टिफिकेट देण्यापर्यंतचे उपद्व्याप विद्यार्थी करतात.

हा प्रोअँक्टिव्ह शब्द जरी आपल्याला खूप वेगळा वाटत असला तरी प्रत्यक्षात प्रोअँक्टिव्ह असणं फारसं कठीण नाही. आजूबाजूला, शाळेत, कॉलेजमध्ये, घरी, समाजात, सगळीकडेच जर बारकाईनं नजर फिरवली तर तुम्हाला बरंचसं करण्यासारखं दिसू शकेल.  

प्लेसमेण्ट होत नाही म्हणून कॉलेजच्या नावाने बोंबा मारण्यापेक्षा स्वत:हून आपल्यासाठी प्लेसमेण्ट शोधण्याचे प्रयत्नही प्रोअँक्टिव्ह याच प्रकारात मोडतात.तुम्ही स्वत:हून हातपाय हलवत, डोकं चालवत जे जे म्हणून स्वत:हून करता, कुणीही काम सांगता करता ते ते प्रोअँक्टिव्ह.ते असेल तुमच्यात तर भविष्यातल्या संधी तुम्हाला शोधतील, नाहीतर आहेच घाण्याचा बैल. फिरतोय गोल गोल!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: